फरार विजय मल्ल्याची मालमत्ता विकून १४ हजार कोटी केले वसूल!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली माहिती

फरार विजय मल्ल्याची मालमत्ता विकून १४ हजार कोटी केले वसूल!

भारतातून फरार असलेल्या विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरुद्ध केंद्र सरकार मोठी कठोर कारवाई करत आहे. आतापर्यंत यांच्या मालमत्ता विकून सरकारने हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत, करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात लोकसभेत मंगळवारी (१७ डिसेंबर) माहिती दिली.

विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोक्सीसारख्या फरार उद्योग पतींच्या मालमत्ता विकून बँकांनी २२,२८० कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. ईडीने ही २२,२८० कोटी रुपयांची संपत्ती पिडीत आणि दावेदारांना परत केली आहे.

यामध्ये विजय मल्ल्याची १४,१३१.६ कोटी रुपयांची मालमत्ता आहे, जी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत करण्यात आली आहे. त्या पुढे म्हणाल्या, निरव मोदी प्रकरणात १,०५२.५८ कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँकांना परत करण्यात आली आहे. मेहुल चोक्सी प्रकरणात २,५६५.९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून तिचा लिलाव करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

भोजनालयात धूम्रपान : मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना दंड

सर्व धार्मिक स्थळे सरकारच्या नियंत्रणाखाली आणा! विशिष्ट धर्माचीच का?

कुर्ला बस अपघात प्रकरण, बेस्ट कंत्राटदाराला ठोठावणार ४ लाखांचा दंड!

७६५ बळींचा मानकरी अश्विनचा क्रिकेटला अलविदा!

नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात १७.४७ कोटी रुपयांची मालमत्ता फसवणुकीला बळी पसलेल्या खऱ्या गुंतवणूकदारांना परत करण्यात आली असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

पीएमपीएल प्रकरणात ईडीने महत्वांच्या प्रकरणात किमान २२,२८० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही, जरी देशातून पळून गेला असला तरी, त्याला शोधून काढू. बँकांचे पैसे परत यायला हवे, असे अर्थमंत्री सीतारमण यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version