२२ महिला पोलीस अधिकार्‍यांसह १४० पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर

तपास कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान

२२ महिला पोलीस अधिकार्‍यांसह १४० पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर

तपास कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल २०२३ या वर्षासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक देण्यात येणार आहेत. यंदा १४० पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना हे पदक प्रदान केले जाणार आहे.

उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिसांना अशाप्रकारचे पदक देण्याचे २०१८ साली ठरवण्यात आले होते. गुन्ह्याच्या तपासातील उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देणे आणि तपास कार्यातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

हे ही वाचा:

‘मणिपूर हिंसाचारावर लष्कर हा तोडगा नाही’

त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी रॅगिंग करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला अटक

बलुचिस्तानमधील नेता घेणार पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ

हा पुरस्कार प्राप्त करणार्‍या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये केंद्रीय गुप्तचर विभागातल्या (सीबीआय) १५, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) १२, उत्तर प्रदेशातील १०, केरळ आणि राजस्थानच्या प्रत्येकी ९, तामिळनाडूतील ८, मध्य प्रदेशातील ७, गुजरात राज्यातून ७ आणि उर्वरित इतर राज्ये, केंद्रशासित प्रदेश, संस्था यांचा समावेश आहे. या पुरस्कार यादीमध्ये २२ महिला पोलिस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

Exit mobile version