जयपूरमधील एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.जयपूरच्या कर्धनी शहरातील एका खाजगी शाळेत पीडित मुलगा आपल्या वर्गात जात असताना संशयास्पद हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
कर्धनी पोलिस स्टेशनचे हेड-कॉन्स्टेबल मनोज कुमार यांनी सांगितले की, योगेश सिंग असे मृत व्यक्तीचे नाव असून तो इयत्ता ९ वीचा विद्यार्थी होता. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास तो आपल्या वर्गाकडे जात असताना अचानक शिक्षकावर कोसळला. “शालेय प्रशासनाने त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले, आणि तेथून त्याला एसएमएस रुग्णालयात पाठवण्यात आले , परंतु तो वाचू शकला नाही,” असे कुमार म्हणाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या मतानुसार मृत्यू हा हृदयविकाराचा झटका मानला जात असून मृतदेहाचे नमुने तपासले जात आहेत.
हे ही वाचा:
डायरोसारखे लोकगीतांचे कार्यक्रम ही आपली शक्ती !
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक घरी देणार निमंत्रण!
बारामतीतील प्रकल्पासाठी २५ कोटी देणाऱ्या अदानींचे पवारांकडून कौतुक
प्रियांका वड्रा, सचिन पायलट यांना बदलले!
शाळेचे अधिकारी विनोद यांनी सांगितले की, मृत योगेश सिंग याला त्याच्या मोठ्या भावाने शाळेत सोडले होते.तो त्याच्या वर्गाकडे जात होता जिथे अर्धे विद्यार्थी आले होते आणि इतर अजूनही येत होते. शिक्षक वर्गाच्या गेटवर उभे होते जिथे तो (सिंग) शिक्षकावर कोसळला.ते पुढे म्हणाले की, शाळेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याला तातडीने वैद्यकीय सेवेसाठी नेले, परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला वाचवता आले नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली.कुटुंबाने आत्तापर्यंत कोणताही संशय व्यक्त केला नाही आणि मृत विद्यार्थ्यांवर योग्य पद्धतीने उपचार देखील करण्यात आले होते.विध्यार्थ्याला यापूर्वी कोणता त्रास होता का? याची चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.