६०२ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह १४ पाकिस्तानी तस्करांना अटक!

गुजरात किनारपट्टीवर एनसीबीची मोठी कारवाई

६०२ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह १४ पाकिस्तानी तस्करांना अटक!

गुजरात किनारपट्टीवर एनसीबीने मोठी कारवाई केली आहे.दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या संयुक्त कारवाईत १४ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून ८६ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे ६०२ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील पाकिस्तान नागरिक असलेल्या तस्करांना एटीएस येणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तस्करांनी पथकावर गोळीबारही केला.मात्र, एटीएस पथकाला सर्वांना पकडण्यात यश मिळाले आहे.

हे ही वाचा:

जेक फ्रेझर-मॅक्गर्क, स्टब्ज, रसिक चमकले; दिल्लीची मुंबईवर मात

‘राजपुत्रामध्ये नवाब, निजाम, सुलतान आणि बादशाह विरोधात बोलण्याची ताकद नाही’

अदानी बंदराबाबत फेक बातमी पसरवणारा ‘तो’ व्हिडीओ गुजरातचा नाही इजिप्तचा !

आमीर खानला पंजाबमध्ये कळली ‘नमस्ते’ची ताकत

भारतीय सागरी सीमेजवळ ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर माहितीच्या आधारे तपास मोहीम सुरु करण्यात आली.गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांचे गुजरातच्या किनारी भागात सर्च ऑपरेशन करत होते.यानंतर एटीएस आणि एनसीबी यांच्या संयुक्त कारवाईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या १४ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून ८६ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, ज्याची किंमत सुमारे ६०२ कोटी रुपयांचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version