छत्तीसगडच्या विजापूरमध्ये १४ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण !

एक लाखाचे बक्षीस असणाऱ्या महिला नक्षलवाद्याचाही समावेश

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये १४ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण !

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात १४ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये एक लाख रुपयांचे बक्षीस असणाऱ्या नक्षलवाद्याचाही समावेश आहे. विजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी ही माहिती दिली. माओवादी संघटनेत कौटुंबिक सुखापासून वंचित राहिल्याने आणि माओवाद्यांच्या जीवनशैली आणि विचारसरणीला कंटाळून नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, यामध्ये एक लाख रुपयांचे बक्षीस असणारी नक्षलवादी महिला केडर नागी पोडिय(38) हिने देखील आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी ‘उसूर-पामेड एरिया कमिटी’, ‘गांगलूर एरिया कमिटी’ आणि ‘भैरमगड एरिया कमिटी’मध्ये सक्रिय होते. २०२४ मध्ये आतापर्यंत १३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर विविध नक्षलवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या ३०६ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले .

हे ही वाचा:

एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू!

विकृत दाऊद शेखने २०१९मध्येही यशश्रीला छळले होते…

कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण तयार होतील

विद्या चव्हाणांना चित्रा वाघ भिडल्या

एसपी जितेंद्र कुमार यादव म्हणाले की, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणानुसार सुविधा पुरविल्या जातील. या वर्षात आतापर्यंत १३७ नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडला आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत ३०६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत नक्षलवाद्यांना प्रत्येकी २५,००० रुपयांचे रोख प्रोत्साहन दिले जाते.

Exit mobile version