१४ खरिप पिकांना केंद्राकडून किमान आधारभूत किंमत जाहीर; दीडपट मोबदला मिळणार

उत्पादन खर्चाच्या दीडपट मोबदला मिळणार

१४ खरिप पिकांना केंद्राकडून किमान आधारभूत किंमत जाहीर; दीडपट मोबदला मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ खरिप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट मोबदला मिळणार आहे.

‘सन २०१८च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने उत्पादनखर्चाच्या किमान दीडपट अधिक पिकांची किमान आधारभूत किंमत असावी, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. हे धोरण लागू करण्याचा निर्णय यंदा घेण्यात आला आहे. प्रत्येक पिकाला यंदा खर्चाच्या तुलनेत किमान ५० टक्के अधिक किमान आधारभूत किंमत मिळेल,’ अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ‘या निर्णयामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणून सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा मोबदला मिळेल. तसेच, गेल्या हंगामाच्या तुलनेत ३५ हजार कोटी रुपये अधिक मिळतील,’ असेही त्यांनी सांगितले.

कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तेलबिया आणि डाळींसाठी विशेषतः कारळ्यासाठी (प्रति क्लिंटल ९८३ रुपये वाढ) सुचवण्यात आली आहे. त्यानंतर तीळ (प्रतिक्विंटल ६३२ रुपयांची वाढ) आणि तूर डाळ (५५० रुपये प्रति क्विंटल दरवाढ) सुचवण्यात आली आहे.

हे ही वाचा..

ऐतिहासिक दोन शतकानंतर गोलंदाजीतही स्मृती मंधानाची कमाल

यूजीसी-नेट परीक्षा रद्द!

शिवराय छत्रपती जाहले!

पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!

कारळ्याची किमान आधारभूत किंमत ५,८११ रुपयांवरून ८,७१७, तीळाची ६,१७८ रुपयांवरून ९,२६७ आणि तूर डाळीची ४,७६१ रुपयांवरून ७,५५० करण्यात आली आहे. तर, भाताची किमान आधारभूत किंमत १,५३३वरून २,३०० करण्यात आली आहे. ज्वारीची किमान आधारभूत किंमत २, २४७वरून ३,३७१ करण्यात आली आहे.

Exit mobile version