तेलंगणामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) चौदा सदस्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दोन एरिया कमिटी मेंबर्स (एसीएम) यांचा समावेश आहे. वारंगल पोलिस आयुक्तालयातील मल्टी झोन-१ चे पोलिस महानिरीक्षक एस.चंद्रशेखर रेड्डी यांच्यासमोर या नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकली.
पोलिस महानिरीक्षक रेड्डी म्हणाले की, १४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या वर्षी आतापर्यंत २५० माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर जानेवारी २०२५ पासून १२ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, तेलंगणा पोलिसांच्या ऑपरेशन चयुथा’ अंतर्गत माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की, माओवाद्यांना प्रोत्साहन म्हणून आदिवासी समुदायांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्पांची माहिती दिली जात होती. यामुळे अनेक माओवादी शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात परतत आहेत. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांपैकी बरेच जण शेजारच्या छत्तीसगड राज्यातील आहेत. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रागुट्टा टेकड्यांमध्ये सुरू असलेल्या संयुक्त शोध मोहिमेबद्दल रेड्डी यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, ही कारवाई छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ करत आहेत. ते म्हणाले की, तेलंगणा पोलिसांचा यात सहभाग नाही.
हे ही वाचा :
भाजपचे राजा इक्बाल दिल्लीचे महापौर; काँग्रेस उमेदवाराला फक्त ८ मते
मराठी भाषिकांचे कैवारी परदेशात फोटोग्राफी करण्यात मग्न!
दहशतवादी आदिलची आई म्हणाली, दोषी आढळल्यास सर्वात कठोर शिक्षा व्हावी!
‘पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला’
दरम्यान, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर गुरुवारी (२४ एप्रिल) झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन माओवाद्यांना ठार केले. एका अधिकाऱ्याने सांगितले कि, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा सीमेवर माओवादी कारवायांबद्दल माहिती मिळाली होती.
यानंतर सुरक्षा दलांची एक संयुक्त टीम माओवादविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आली. या दरम्यान, कर्रागुट्टा टेकड्यांच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी ३ माओवादी मारले गेले. परिसरात शोधमोहीम सुरु आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
మావోయిస్టులను జనజీవన స్రవంతిలోకి తీసుకువచ్చేందుకు తెలంగాణ పోలీసులు చేస్తున్న కృషి ఫలిస్తోంది. ఇవాళ వరంగల్లో మల్టీ జోన్-1 ఐజీ ఎస్. చంద్రశేఖర్రెడ్డి ఎదుట 14 మావోయిస్టులు లొంగిపోయారు. వారిలో ఇద్దరు ఏరియా కమిటీ సభ్యులు, ఒక మిలీషియా కమాండర్ ఉన్నారు. #TelanganaPolice pic.twitter.com/LyNDRE2PKO
— Telangana Police (@TelanganaCOPs) April 24, 2025