सिक्कीमध्ये बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी अचानक ढगफुटी होऊन पूरसदृश स्थिती निर्माण झाली. या ढगफुटीनंतर राज्यातील तीस्ता नदीला भीषण पूर आला. या पुरात आत्तापर्यंत १४ जण ठार झाले असून १०२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. तर, ३ हजार पर्यटक राज्यातील विविध भागांमध्ये अडकून पडले आहेत.
सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे तीस्ता नदीला भयंकर पूर आला. नदीला पूर येऊन इतक पाणी वाढलं की, चुंगथांग धरणातून पाणी सोडावं लागलं. त्यामुळे अचानक पाण्याचा स्तर १५ ते २० फूटाने वाढला. यानंतर सर्वत्र हाहाःकार उडाला असून भारतीय लष्कराचे तब्बल २३ जवान बेपत्ता झाले. या घटनेनंतर प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
तीस्ता नदीवर चुंगथांग येथे धरण उभारण्यात येत असून याच्या तिसऱ्या टप्प्यातलं काम सुरु होतं. यासाठी १२ ते १४ कामगार काम करत होते. या सर्वजण तिथल्या एका बोगद्यात अडकून पडले आहेत. त्याचबरोबर मांगण जिल्ह्यातील चुंगथांग, डिग्चू, गंगटोक जिल्ह्यातील सिंगताम आणि पाकयोंग जिल्ह्यातील रांगपो इथं २६ लोक जखमी तर बारडांग येथे २३ जवान अद्यापही बेपत्ता आहेत. या पुराच्या पाण्यामुळं हायवे देखील वाहून गेला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यानंतर राज्य सरकारकडून आणखी तीन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहे. सध्या एनडीआरएफची एक एक टीम रांगपो आणि सिंगतम शहरात तैनात आहेत.
हे ही वाचा:
नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज
‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा
सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही बी पाठक यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, लोनाक तलावावर मंगळवारी रात्री १०.४२ वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यानंतर या तलावातील पाण्याला मोठ्या प्रमाणावर उधाण आलं, त्यानंतर हे पाणी थेट तीस्ता नदीच्या पात्रात शिरलं. यामुळं तीस्ता नदीच्या पाण्यानं पात्र सोडून वाहू लागली, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.