आसाममध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत १४ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले. पहाटे पाच वाजता हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, बस अठखेलिया येथून बालीजानला जात असताना कोळसा भरलेल्या ट्रकला धडकली. पोलिसांनी सांगितले की, ४५ प्रवासी घेऊन ही बस ३ वाजण्याच्या सुमारास पिकनिकसाठी निघाली होती.
बस अठखेलिया येथून बालीजानला जात हा अपघात झाला. मार्गेरिटा येथून कोळशाने भरलेला ट्रक येत होता.त्याच दरम्यान बस आणि ट्रक मध्ये जोरात धडक झाली. या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सर्व जखमींना जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती नाजूक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच
रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र
ओवैसी यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्याचा भाजपा नेत्याकडून समाचार
बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!
गोलाघाटचे एसपी राजन सिंह यांनी सांगितले की, हा अपघात डेरगावजवळील बलिजनमध्ये झाला.या बस मध्ये एकूण ४५ प्रवासी होते.ही बस अप्पर आसामच्या दिशेने जात होती. त्याचवेळी, बस उजव्या लेनमध्ये असताना ट्रक चुकीच्या दिशेने जोरहाटच्या दिशेने येत होता, तेव्हा दोघांमध्ये धडक झाली.या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सकाळी रस्त्यावर दाट धुके होते आणि हा अपघात एवढा भीषण होता की, बसचा चक्काचूर झाला आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.