नेपाळ : भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, १६ जणांचा मृत्यू !

१६ जण जखमी, बचावकार्य सुरु

नेपाळ : भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, १६ जणांचा मृत्यू !

नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत शुक्रवारी (२३ ऑगस्ट) एक भारतीय प्रवासी बस कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर अजूनही १० जन बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमधील काही जण महाराष्ट्रामधील आहेत. पोखराहून काठमांडूला जात असताना हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ४० प्रवासी असल्याची माहिती आहे.

तनहुन जिल्ह्याचे डीएसपी दीपकुमार राया यांनी सांगितले की, नदीत कोसळलेली बस उत्तर प्रदेशची असून ‘यूपी एफटी ७६२३’ असा बस क्रमांक आहे. तनहुन जिल्ह्यातील आयना पहारा येथे हा अपघात झाला. वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखालील ४५ पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक अपघातस्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील भारतीय प्रवासी पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबले होते. शुक्रवारी सकाळी ही बस पोखराहून काठमांडूला जात असताना ही दुर्घटना घडली.

हे ही वाचा :

‘४० आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरे अजून ट्रॉमात’

कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे स्वीकारले अध्यक्षपदासाठीचे नामांकन

रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूर बंद !

अरविंद केजरीवालचं दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमधील काही लोक महाराष्ट्रातील भुसावळ येथील आहेत. देव दर्शनासाठी महाराष्ट्रातील लोक नेपाळला गेले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी सांगितले की, नेपाळमधील घटनेच्या संदर्भात, आम्ही बसमध्ये उत्तर प्रदेशातील कोणी व्यक्ती आहे की नाही हे शोधण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. घटनेची सविस्तर माहिती मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version