उमर गौतमसह १४ जणांची धर्मांतरणाची टोळी दोषी !

जन्मठेपेची होऊ शकते शिक्षा

उमर गौतमसह १४ जणांची धर्मांतरणाची टोळी दोषी !

फतेहपुर मधील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात लखनऊच्या एनआयए-एटीएस (NIA-ATS) न्यायालयाने मौलाना उमर गौतम आणि मौलाना कलीम सिद्दीकीसह १४ आरोपींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी उद्या बुधवारी (११ सप्टेंबर) न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोषी ठरवण्यात आलेले आरोपी फतेहपूरमध्ये टोळी तयार करून अवैध धर्मांतराचे रॅकेट चालवायचे.

एनआयए-एटीएस न्यायालयाने आरोपींना कलम ४१७, १२०बी, १५३ए, १५३बी, २९५ए, १२१ए, १२३ आणि बेकायदेशीर धर्मांतराच्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत दोषी ठरवले आहे. या प्रकरणात, दोषींना १० वर्षांच्या कारावासापासून ते कमाल जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. एनआयए-एटीएस न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी उद्या सर्व दोषींना शिक्षेची घोषणा करतील.

हे ही वाचा : 

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनाच लाल चौकात जाण्याची भीती वाटत असे!

हरियाणा निवडणुकीसाठी भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर !

अजित पवार म्हणतात, अमित शहांसमोर मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला नाही

विनेश फोगटला तिकीट दिल्याने अनेक काँग्रेस नेते नाराज !

यूपी एटीएसने या लोकांना स्वतंत्रपणे अटक केली होती. ही टोळी देशभरात अवैध धर्मांतर करत असे. जे आर्थिक दुर्बल आणि अपंग आहेत त्यांना ते टार्गेट करायचे. लोकांना गोड बोलून, भीती दाखवून-धमकी देवून आणि दबाव टाकून त्यांचे धर्मांतर करायचे. धर्मांतरानंतर लोकांवर त्यांच्या मूळ धर्माच्या लोकांनाही धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात येत असे. लोक आपल्या मूळ धर्माकडे पुन्हा परत जाऊ नयेत, याची काळजी या टोळीने घेतली जात असे. त्यासाठी विशेष कार्यशाळा व प्रशिक्षण, ब्रेनवॉश करण्यात यायचे.

Exit mobile version