25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेष१४ फुट लांबीची कोठडी, एक टीव्ही आणि तीन पुस्तके!

१४ फुट लांबीची कोठडी, एक टीव्ही आणि तीन पुस्तके!

मुख्यमंत्री केजरीवाल यांना १५ दिवसांची कोठडी

Google News Follow

Related

तिहार तुरुंगाचे नाव काढले की तेथील उंचच उंच भिंती, तारा आणि एका बाजूला पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तातील जागेचे चित्र मनात उमटते. या तुरुंगात देशभरातील गुन्हेगार राहतात. आता याच तुरुंगात अरविंद केजरीवालही बंद आहेत. केजरीवाल यांना मद्यघोटाळ्या प्रकरणी १५ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

सोमवार, १ एप्रिल रोजी संध्याकाळी सव्वा चार वाजता केजरीवाल यांनी तुरुंगात पाऊल टाकले.तिहार तुरुंगातील कोठडी क्रमांक दोनमध्ये केजरीवाल यांना ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या कोठडीत आम आदमी पक्षाचे संजय सिंह बंद होते. नंतर त्यांना तुरुंग क्रमांक सहामध्ये टाकण्यात आले. तर, मनीष सिसोदिया तुरुंग क्रमांक एकमध्ये आहेत. तर, याच प्रकरणातील चौथ्या आरोपी कविता यांना महिलांचा तुरुंग क्रमांक सहा येथे ठेवण्यात आले आहे. तर, अन्य एक आरोपी विजय नायर तुरुंग क्रमांक चारमध्ये बंद आहेत. तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन तिहार तुरुंगातील सात क्रमांकाच्या तुरुंगात बंद आहेत.

सर्व आरोपींचे तुरुंग आजूबाजूलाच आहेत. मात्र कोणीच एक-दुसऱ्याची भेट घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांची तुरुंगात आत बैठक होऊ शकेल, याची शक्यता कमी आहे. केजरीवाल यांनी तुरुंगात अभ्यासासाठी तीन पुस्तकांची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी रामायण, गीता आणि नीरजा चौधरी यांचे ‘हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाइड’ या पुस्तकाची मागणी केली आहे. तसेच, तुरुंगात औषधे ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, तुरुंगात भेट देऊ शकतील, अशा सहा जणांची नावे दिली आहेत.

तुरुंग नियमानुसार, तुरुंगातील कैद्याला त्याला ज्याला भेटायची इच्छा आहे, अशा १० व्यक्तींची नावे तो देऊ शकतो. या नियमानुसार, त्यांनी पत्नी सुनीता, मुलगा पुलकीत, मुलगी हर्षिता, मित्र संदीप पाठक, पीए विभव कुमार आणि आणखी एका मित्राचे नाव दिले आहे.

हे ही वाचा:

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरमध्ये ३७० कलम लावून घोडचूक केली!

दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी रामदेव बाबांनी न्यायालयात हजर होऊन मागितली माफी

अनियमित व्यवहार, नियमभंगामुळे काँग्रेसला साडेतीन हजार कोटींचा कर

अल जझीराला ‘दहशतवादी वाहिनी’ म्हणत इस्रायलमध्ये प्रक्षेपणावर बंदी

आठवड्यातून दोन व्हिडीओ कॉल करण्यास मुभा
केजरीवाल यांनी सोमवारी तुरुंगात घरून पाठवण्यात आलेला जेवणाचा डबा खाल्ला. ते आठवड्यातून दोनदा व्हिडीओ कॉल करू शकतील. ते रोज पाच मिनिटे फोनवर बोलूही शकतात. ज्यांची नावे त्यांनी नोंदवली आहेत, त्यांच्याशी ते रोज पाच मिनिटे बोलू शकतात.

तुरुंगात असतील या सुविधा
ज्या कोठडीत केजरीवाल यांना ठेवण्यात आले आहे, ही कोठडी सुमारे १४ फूट लांब आणि आठ फूट रुंद आहे. यात शौचालयही आहे. तसेच, टीव्हीदेखील आहे. सिमेंटचा कट्टाही असून त्यावर अंथरण्यासाठी चादरही दिली आहे. तसेच, पांघरूण आणि एक उशीही देण्यात आली आहे. त्यात दोन बादल्याही असतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा