मध्य प्रदेशमधील डिंडोरी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, २१ जण जखमी आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. बडझर घाटात पिकअपचा भीषण अपघात होऊन ही दुर्घटना घडली आहे. पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटले आणि त्यामुळे ही घटना घडली, अशी माहिती समोर आली आहे.
पिकअप वाहनाचा अपघात इतका भीषण होता की १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वजण डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमानंतर घराकडे परतत होते. तेव्हा घाटामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडला. या अपघातामधील जखमीवर शाहपुरा सार्वजनिक आरोग्यय केंद्रामध्ये उपचार सुरु आहेत. जखमी झालेल्या काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आले आहे . दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्याशिवाय स्थानिकांनीही तात्काळ मदत केली. डिंडोरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री शिंदेंच्या खोट्या सह्या आणि शिक्यांचा वापर!
‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला
आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी
अकबर महान कसला?, तो तर बलात्कारी!
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४-४ लाखांची मदत जाहीर केली आहे. मोहन यादव म्हणाले की, मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या कुटुंबांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. जखमींवर आवश्यक उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने डिंडोरी जिले में हुई वाहन दुर्घटना में कई अनमोल जिंदगियों के असामयिक निधन पर गहन शोक व्यक्त किया है।
उन्होंने ईश्वर से दिवंगत आत्माओं की शांति व परिजनों को यह वज्रपात सहन करने की शक्ति देने की प्रार्थना की है।
मुख्यमंत्री जी ने कहा कि घटना में…
— Chief Minister, MP (@CMMadhyaPradesh) February 29, 2024