मुंबईतील वरळी अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला १४ दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी मिहीर शाहला आज (१६ जुलै) न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून आरोपी मिहीरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
आरोपी मिहीरला कोर्टात हजर करताना पोलिसांनी खाजगी कार वापरल्याची माहिती आहे. तसेच खाजगी वाहनाच्या काचेला ब्लॅक फ्रेम असल्याची माहिती आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी खाजगी वाहनाचा वापर केला आहे. तसेच अपघात प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन कलमे वाढवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या कारचा इन्शुरन्स संपला होता. यासह बीएमडब्ल्यू कारच्या काचेवर ब्लॅक फ्रेम असल्याने या प्रकरणी पोलिसांनी कलम वाढवले आहे.
हे ही वाचा:
एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार
मौलाना रझा म्हणतात, जोडप्यांना इस्लाममध्ये धर्मांतरित करणार, कारवाईची मागणी !
भाजपकडून नमो एक्स्प्रेस ट्रेन पंढरपूरला रवाना
मनोरमा खेडकरांचा पोलिसांशी हुज्जत घालतानाचा आणखी एक व्हिडिओ समोर!
दरम्यान, अपघातानंतर आरोपी मिहीर फरार होता. मात्र दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर (९ जुलै) मिहीरला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याची १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी पोलिसांनी मिहीरची आणखी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी मागितली, न्यायालयाने ती मंजूर केली.