24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषमविआकडून १४ कोटी मतदारांचा अपमान!

मविआकडून १४ कोटी मतदारांचा अपमान!

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Google News Follow

Related

महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेने मते दिली आहेत. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले, त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मतं दिली आहेत. जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तसेच ४४० व्होल्टचा करंटही दिला आहे, असाही टोला त्यांनी लगावला. कोराडी (नागपूर) येथील जनसंपर्क कार्यालयात बावनकुळे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

नांदेडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला, त्या ठिकाणी ईव्हीएम चांगली होती का? असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील मतदारांनी महायुती सरकारच्या योजनांना मत दिले आहे. आमचे सरकार उत्तम काम करू शकते, असा जनतेचा विश्वास आहे, म्हणूनच हा जनादेश मिळाला आहे. लोकसभेत मविआचे खासदार निवडून आले, तेव्हा ईव्हीएम चांगली होती. सध्या महाविकासवाल्यांना झोप लागत नाही. त्यांना जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील. महाविकासच्या लोकांनी तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा आपली मते का कमी झाली याचे चिंतन करावे.

हे ही वाचा : 

देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा, शिंदेंनी दिला पाठींबा

इस्कॉनवर बंदी घालण्याची बांगलादेश न्यायालयात मागणी

झारखंडमध्ये भाजपला मतदान केले म्हणून हिंसाचार

दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी जम्मूमध्ये एनएसजीचे पथक कायमस्वरूपी तैनात !

तीन पक्षांचे सरकार बनवताना थोडा वेळ लागतोच, मंत्रीपद कसे वाटायचे, कोणाला कोणते खाते द्यायचे, पालकमंत्री कुठे कोण असेल हे सर्व सूत्र तयार करून सरकार तयार होते. नुसतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव निश्चित करणे एवढेच नसते. त्यामुळे काही काळ जाईल आणि लवकरच सरकार बसेल. शपथ नोव्हेंबर मध्ये होईल की डिसेंबर मध्ये होईल, हे काही पॅरामीटर नाही. सध्या काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, महायुतीमधील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे. यावर तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर भाजपाचा कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो. पक्षाचे नेते योग्य निर्णय करतात. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपासोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता, असाही टोला बावनकुळे यांनी लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा