महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून १४ मुले जखमी!

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जखमी मुलांची भेट घेतली

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून १४ मुले जखमी!

राजस्थानमधील कोटा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे.महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून १४ मुले जखमी झाले आहेत.विजेच्या धक्क्याने १४ मुले भाजली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आते तर एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.अपघाताची माहिती मिळताच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राजस्थानचे ऊर्जा मंत्री हीरालाल नागर जखमी मुलांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त राजस्थानमधील कोटा येथे मिरवणूक काढण्यात आली होती.मिरवणूक कुन्हडी थर्मल चौकाजवळून जात असताना हा अपघात झाला.या मिरवणुकीत लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.या दुर्घटनेत १४ मुले जखमी झाले असून त्यांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अनेक मुलांचे हात-पाय भाजलेले दिसत आहेत.सर्वांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

सुधा मूर्तींची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती

“मराठा आरक्षणाअंतर्गत होत असलेली भरती प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन राहणार”

१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनात ‘उघडपणे’ शस्त्र बाळगण्यास परवानगी!

अपघाताची माहिती मिळताच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील रुग्णालयात पोहचले.मुलांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे.एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.मुलांच्या उपचारात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश रुग्णालयाला देण्यात आले आहेत.

याप्रकरणी कोटा एसपी अमृता दुहान यांनी सांगितले की, काली बस्ती जवळ मिरवणूक जात असताना हा अपघात झाला.या मिरवणुकीत महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश होता.या मिरवणुकीमध्ये लहान मुलांच्या हातात झेंडे होते.त्याच वेळी एका मुलाच्या हातातील झेंडा, ज्याला लोखंडी पाईप होती ती उंचावर असणाऱ्या विजेच्या तारेला स्पर्श झाली.त्यामुळे मुलांना विजेचा धक्का बसला.त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मुलांना देखील विजेचा धक्का बसला.विजेच्या धक्क्यात तब्बल १४ मुले भाजली.यामध्ये एका मुलगा जास्त प्रमाणात भाजला आहे.जखमी सर्व मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, असे एसपी अमृता दुहान यांनी सांगितले.

Exit mobile version