26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषतौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली

तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली

Google News Follow

Related

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळी मुंबईत अवघ्या दोन तासात १३२ झाडे उन्मळून पडली आहेत. त्यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येते.

मुंबईत कालपासूनच जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. जोरदार वाऱ्यामुळे काल १६ मे रोजी मुंबईत ५० झाडे उन्मळून पडली. तर आज सकाळी ८ ते १० या दोन तासात एकूण १३२ झाडे कोसळून पडली आहेत. त्यात शहरात ५९, पूर्व उपनगर १५ आणि पश्चिम उपनगरातील ५८ झाडांचा समावेश आहे. सुदैवाने झाड कोसळल्याने कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नाही. तसेच कुणालाही मार लागला नसल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलवर आज एका झाडाची फांदी कोसळली. ओव्हरहेड वायरवर ही फांदी कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने लगेचच धूर निघाला. त्यामुळे लोकल तात्काळ थांबवावी लागली. परिणामी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या घटनेमुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाड दूर केलं.

मुंबईत एकूण पाच ठिकाणी घरे पडणे आणि भिंती खचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या घटनांमध्ये कुणालाही मार लागला नाही. मुंबईत जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. मुंबईच्या अरबी समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून हा सी-लिंक बंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

टुकार सरकार सत्तेवर असल्यास, राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणारच

कोरोनामुळे नाही उपासमारीने आधी मरू

अजितदादांच्या मनात बहुजनांविषयी आकस

महाराष्ट्रात ५९ हजार ३१८ नवे कोरोना रुग्ण

पाऊस, सोसाट्याचा वारा आणि ढगाळ हवामान यामुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईतील वातावरण ढगाळ राहणार आहे. येत्या २४ तासात मुंबीत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा