राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होणार असून आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीमधील घटक पक्ष भाजपाला १३२, शिवसेना शिंदे गटाला ५७ आणि राष्टवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे संख्याबळाचा विचार केला तर भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्री पदासाठी शिंदे गट आणि अजित पवार गट देखील इच्छुक असल्याची माहिती आहे. याच दरम्यान, भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री पदावर वक्तव्य केले आहे. भाजपला १३२ जागा मिळाल्या असून स्ट्राईक रेट ८९ टक्के आहे आणि मुख्यमंत्री म्हणून भाजपचा चेहरा फडणवीस असल्याचे म्हटले आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणून कोण?, असा प्रश्न विचारला असता महाजन म्हणाले, आमचे १३२ आमदार आहेत, स्ट्राईक रेट ८९ टक्के आहे, आम्ही कोणालाही पाडापाडी न करत सर्वांना सोबत घेवून गेलो, एकसंघ लढल्यामुळे आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या. त्यामुळे साहजिकच आहे आणि कोणालाही वाटेल की, मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा. मुख्यमंत्री कोण तर आमच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचेच नाव आहे. यासंदर्भात दिल्लीतील पक्ष श्रेष्ठी तिन्ही नेत्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेतील.
हे ही वाचा :
संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार झियाउर बुर्क यांच्यावर गुन्हा दाखल
‘दर्शन घे काकांचं, थोडक्यात वाचलास’
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, अंदमानमध्ये ५ टन ड्रग्ज जप्त!
नौदलाच्या INSV तारिणीने ऑस्ट्रेलियातून दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेला सुरुवात
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यानावावर शिवसेना शिंदे आणि अजित पवार गटाने सहमती दाखविली आहे का?असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, आम्हाला वाटणे साहजिकच आहे, मला देखील ३५ वर्षांचा अनुभव आहे, पक्षाच्या सीट-स्ट्राईक रेट बघा, सगळ्यात मोठ्या पक्षाने मागे राहावे असे आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गेल्यावेळी शिंदे आमच्याकडे आले, मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे नाव होते मात्र, ऐनवेळी ते बदलण्यात आले आम्ही ते मान्यही केलं आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी आमच्याकडे १०५ आणि १० अशी मिळून ११५ असे संख्याबळ होते. पण तरीही ४५ आमदार असलेल्या शिंदेना आम्ही मुख्यमंत्री केले. आम्हाला तसा वरून आदेश होता. त्यामुळे आमची इच्छा आहे पण यासंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे गिरीश महाजन म्हणाले.