24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषबुलेट ट्रेनसाठी १२९.७१ हेक्टर वनजमीन मिळणार

बुलेट ट्रेनसाठी १२९.७१ हेक्टर वनजमीन मिळणार

मुंबईतील बीकेसीपासून आणि गुजरातच्या साबरमती येथील टर्मिनस स्टेशनपर्यंत हा रेल्वे मार्ग

Google News Follow

Related

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आता वेग येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १२९.७१ हेक्टर (३२०.५२एकर) वनजमीन देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच या कामाचा वेग वाढेल.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा ५०८ किमीचा मार्ग आहे. मुंबईतील बीकेसीपासून आणि गुजरातच्या साबरमती येथील टर्मिनस स्टेशनपर्यंत हा रेल्वे मार्ग आहे. त्यातील २१ किमीचा मार्ग भूमिगत आहे. त्यातील सात किमीचे अंतर हे समुद्राखालून आहे. ही वनजमीन मुंबई-अहमदाबाद मार्गासाठी हस्तांतरित करण्याची अधिसूचना महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाच्या अवर सचिवांनी २७ जुलै २०१३ रोजी जारी केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२२ मध्ये नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएचएसआरसीएल) २१ हजार ९९७ खारफुटीची झाडे तोडण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी एनएचएसआरसीएलने ५३ हजार खारफुटी कापण्याची परवानगी मागितली होती, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही संख्या २१ हजार ९९७ करण्यात आली. आता १८ हजार ७५ झाडे कापली जाणार आहेत.

हे ही वाचा:

अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग; रुग्णांची झाली पळापळ, पण जीवितहानी नाही

‘मणिपूरमधील संघर्षात परकीयांचा हात असू शकतो’

स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला

“महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागाने बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी १२९.७१ हेक्टर वनजमीन सुपूर्द करण्यास मंजुरी दिली आहे. हा बुलेट ट्रेन प्रकल्प ठाणे, पालघर आणि मुंबईतील काही भागांतून जातो. या प्रकल्पासाठी सुरुवातीला १३१. ३०२ हेक्टर जमिनीची मागणी करण्यात आली होती. परंतु संरेखनात केलेल्या बदलांमुळे ती थोडी कमी झाली होती. या आदेशामुळे महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी आता एकूण ४३३.८२ हेक्टर (१०७२ एकर) पैकी फक्त ०.२१ टक्के जागा आवश्यक आहे.

हस्तांतरित केलेल्या एकूण वनजमिनींपैकी ४९.५३ हेक्टर (१२२.३९ एकर) वनजमीन ठाण्यात येते, तर, ७१.६१ हेक्टर (१७७.१० एकर) जमीन डहाणूमध्ये येते, तर, ८.३९ हेक्टर जमीन खारफुटींची आहे. ०.११३८ हेक्टर (०.२८१एकर) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (एमएएचएसआर) कॉरिडॉरसाठी महाराष्ट्राच्या १५६ किमी भागासाठी तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. ही वनजमीन हस्तांतरित करण्यात आल्यामुळे आता मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पाला वेग येणार आहे,’ असे सूत्रांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा