बाईकच्या शर्यतीत डोक्यावरील हेल्मेट पडले; १३ वर्षीय रेसरचा झाला मृत्यू

'द बेंगलुरु किड' म्हणून श्रेयसची ओळख

बाईकच्या शर्यतीत डोक्यावरील हेल्मेट पडले; १३ वर्षीय रेसरचा झाला मृत्यू

स्पेनमध्ये नुकत्याच झालेल्या टू-व्हीलर रेसिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा बाईक रेसर श्रेयस हरीश याचा अपघात होऊन मृत्यू झाला. श्रेयस हरीश हा १३ वर्षीय बाईक रेसर असून टू-व्हीलर रेसिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा हा पहिला भारतीय ठरला होता. चेन्नईतील मद्रास मोटर रेसिंग ट्रॅकवर झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे.

मे महिन्यात स्पेनमध्ये टू-व्हीलर रेसिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपची सुरुवात झाली.या चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये १३ वर्षीय बाईक रेसर कोपरम श्रेयस हरीशचा जीवघेणा अपघात होऊन मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी चेन्नईच्या इरुंगट्टुकोट्टई येथे नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप (NMRC) मध्ये झाला.चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचणारा श्रेयस हा पहिला भारतीय रेसर होता.

हे ही वाचा:

‘जगदीश टायटलर यांनी जमावाला उकसवले; पुरेसे शीख मारले गेले नाहीत, असे म्हणाले’

इंडिगोच्या विमानात झाला एसीचा इश्यू; घाम पुसण्यासाठी वापरावे लागले टिश्यू!

अतिक अहमद टोळीचा सदस्य इरफान हसन पोलिसांच्या ताब्यात

नूंह हिंसाचार प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा ‘आप’ नेत्यावर आरोप

मृत श्रेयस हा ‘द बेंगलुरु किड’ म्हणून प्रसिद्ध होता. शनिवारी शर्यतीच्या तिसऱ्या फेरीत स्पर्धेदरम्यान श्रेयस आपली २००cc मोटारसायकल चालवत असताना अचानक घसरून पडला त्यात त्याच्या डोक्यावरील हेल्मेट डोक्यावरून निघाले. मागून येणारा दुसरा रायडर आपली बाईक थांबवू शकला नाही आणि तो श्रेयसला आपटला. यामुळे श्रेयसच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर श्रेयसला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

श्रेयसच्या मृत्यूनंतर, मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लबने शनिवार व रविवारच्या उर्वरित शर्यती रद्द केल्या आहेत. श्रेयसने नुकताच २६ जुलै रोजी आपला १३ वा वाढदिवस साजरा केला होता. उत्कृष्ट मोटारबाइक रेसर म्हणून श्रेयसची ओळख होती.या वर्षी मे महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या दुचाकी रेसिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पहिला भारतीय पोहोचल्याने रेसिंग प्रॉडिजीने इतिहास रचला आहे. त्याने स्पेनमधील एफआयएम मिनी-जीपी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत आपली प्रतिभा आणि क्षमता दाखवून पहिल्या आणि त्यानंतरच्या दुसऱ्या शर्यतींमध्ये अनुक्रमे ५ वे आणि ४ वे स्थान मिळवले.

 

श्रेयसने भारतातील FIM Mini-GP मध्ये त्याच्या कारकिर्दीची सुरुवात करत २०२२ मध्ये चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर, त्याने राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आणि दोन पोडियम पूर्ण केल्या.त्यानंतर TVS ने त्याला रुकी कपसाठी निवडले. त्यांनी तरुण प्रॉडिजीला प्रशिक्षण दिले आणि त्याला शर्यतींसाठी टीव्हीएस बाइक दिली.श्रेयसने रुकी प्रकारातील पहिल्या चार शर्यती जिंकल्या आणि नंतर प्रो-स्टॉक १६५cc ओपनमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तज्ञांच्या मते, तो देशातील संभाव्य रेसर्सपैकी एक मानला जात असे.

Exit mobile version