१३ अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन

१३ अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहीत

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
राज्य सरकारकडून नुकतेच करोनासंदर्भात नियम लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात करोनाबाबतचे कठोर नियम लागू असणार आहेत. त्यामुळे परीक्षांचे नियोजन कसे होणार हा प्रश्न होता. सामंत यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधल्या कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरू देखील केल्या होत्या. मात्र, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

वेदांत समुहाकडून प्राणवायूसाठी दक्षिणेतील काही भागांत मदत

सेन्सेक्समध्ये आज उसळी

नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला दररोज प्राणवायूचा पुरवठा

मोदी सरकारवर टीका ही तर मजबूरी

“कोविडच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे”, अशी माहितीही सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Exit mobile version