27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषगडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

Google News Follow

Related

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सी-६० पोलीस पथकाने १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलीस विभागाकडून दोन तासापासून चकमक सुरु आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात चकमक सुरु आहे. कोटरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीद्वारे पहाटे सी-६० पोलीस पथकाने ऑपरेशन सुरु केले होते.

नक्षलवाद्यांनी त्यांचा मोर्चा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याकडे वळवल्याचं चित्र आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर गेल्या महिन्यात ग्रेनेड टाकला होता. त्याचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जाते. पोलीस स्टेशनपर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क व्हावं लागत आहे.

सध्याचा काळ हा तेंदू पत्ता संकलनाचा काळ आहे. या संपूर्ण भागाची अर्थव्यवस्था तेंदू पत्ता संकलनावर अवलंबून आहे. त्यामुळं याला नेमकी किंमत द्यायची याकडे शासनाचा भाग असला तरीही सत्यपरिस्थिती हीच आहे कि नक्षलवादीच या किमती ठरवतात. याच किंमती ठरवण्यासाठीची बैठक नक्षलवाद्यांनी एका गावात बोलावली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी आखणी करत बैठक सुरु असताना दबा धरून बसून, त्यांनी ही कारवाई केली.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमधील पिडीत हिंदूंच्या मदतीसाठी विहिंपचा पुढाकार

लसीकरणाचा गोंधळ आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा

डीएपीच्या भाववाढीला शरद पवार, मनमोहन सिंह जबाबदार

सदर बैठकीला गावकरी, कंत्राटदारांच्या प्रतिनिधींचीही उपस्थिती असते. याच आधारे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांना यश आहे. सध्याच्या घडीला मारल्या गोलेल्या ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. अनेकदा नक्षलवादी काही मृतदेह सोबत नेतात, पोलिसांना त्यांच्या वाट्याला आलेल्या यशाची चाहूल लागू न देण्यासाठी असं केलं जातं. या कारवाईत याचीच पुनरावृत्तीही झाल्याचा अंदाज आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा