हळद हसली, उत्पादन वाढले

हंगामात देशात तीन लाख ५६ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे.

हळद हसली, उत्पादन वाढले

यंदाच्या हंगामात देशात पिकांसाठी पोषक वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर यंदा देशात हळदीचे उत्पादन अधिक प्रमाणात होईल, असा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. यावर्षी दहा टनांहून अधिक हळदीचे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातं आहे.

यावर्षी हंगामात देशात तीन लाख ५६ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. तसेच यावर्षी पोषक वातावरणामुळे सुमारे तेरा लाख टनांपर्यंत हळदीचे उत्पादन होईल, असा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

वर्ष २०२०-२१ मध्ये देशात दोन लाख ९२ हजार ८७६ हेक्टरवर हळदीची लागवड केली होती. तर २०२१-२२ मध्ये ही लागवड तिप्पट म्हणजेच तीन लाख ४९ हजार ६४२ लाख हेक्टरवर करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून हळदीच्या लागवडीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतं आहे. २० ते २५ टक्क्यांनी हळद लागवड वाढल्यामुळे उत्पादनही वाढले आहे. मात्र, उत्पादन अधिक झाल्याने हळदीच्या दरात फारशी तेजी दिसून आलेली नाही.

यंदाच्या हंगामात हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यांत मार्च -एप्रिल मध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. परंतु, मे महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस झाला. अशा पोषक वातावरणामुळे हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. मात्र ऑक्टोबर महिन्यांतील परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान होईल अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, परतीच्या पावसाचा तितकासा परिणाम पीकावर झाला नाही.

हे ही वाचा:

‘बोम्मईंच्या खात्यावरून ट्विट कोणी केलं लवकरचं कळेल’

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मविआचे आंदोलन

‘मोदी यांच्या भूमिकेमुळे जागतिक संकट टळले’

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून देशांत हळदीचे उत्पादन वाढत आहे. यंदा हंगामात गेल्या वर्षी इतकेच हळदीचे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज हळद संशोधन योजना ,कसबेडिग्रज जिल्हा सांगलीचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी व्यक्त केला आहे. देशातून हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मागील वर्षी एक लाख ५३ हजार १५४ टन हळदीची निर्यात झाली होती. यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यात आणखी वाढेल असे म्हटले जातं आहे.

Exit mobile version