दुसऱ्या टप्प्यात १३ इस्रायली, १४ थायलंडचे नागरिक रेड क्रॉसला सुपूर्द!

सुटका झालेल्या ओलिसांमध्ये पुरुष, लहान मुलांचा समावेश

दुसऱ्या टप्प्यात १३ इस्रायली, १४ थायलंडचे नागरिक रेड क्रॉसला सुपूर्द!

हमासच्या गटाने दुसऱ्या टप्प्यात १३ इस्रायली नागरिक आणि चार थायलंडच्या नागरिकांची सुटका करून त्यांना आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेकडे सुपूर्द केले. हे सर्व नागरिक इस्रायलमध्ये दाखल झाल्याच्या वृत्ताला इस्रायलनेही दुजोरा दिला आहे.

‘सुरुवाला वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर इस्रायल संरक्षण दलाच्या सैनिकांच्या बंदोबस्तात मुक्तता झालेल्या इस्रायलच्या रुग्णालयांच्या दिशेने प्रयाण केले. तेथे त्यांची त्यांच्या नातेवाइकांसोबत भेट होईल,’ अशी माहिती इस्रायलच्या लष्करातर्फे देण्यात आली. सुटका झालेल्या ओलिसांमध्ये सहा पुरुष आणि सात लहान मुले आणि किशोरवयीन मुलांचा समावेश असल्याचे इस्रायलच्या सरकारने स्पष्ट केले.

७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यात इस्रायलच्या नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. तब्बल ५० दिवस ओलिस ठेवल्यानंतर त्यातील काही नागरिकांची सुटका झाली आहे. ‘या अपहृतांना रेड क्रॉस संघटनेने इजिप्तकडे सुपूर्द केले होते. इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी केरेम शालोम येथे या सर्व ओलिसांना इस्रायल सरकारकडे सुपूर्द केले. हमासनेही या १३ इस्रायली ओलिसांच्या दुसऱ्या गटाचे छायाचित्र जाहीर केले.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!

कोची विद्यापीठातील कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू!

तोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!

दगडफेकीच्या घटनेबाबत नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा!

हमासने दुसऱ्या गटातील ओलसांची सुटका करण्यात दिरंगाई केल्याने इस्रायलने हमासला मुदत दिली होती. या मुदतीत ओलिसांची सुटका न केल्यास गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाया सुरू करण्याचा इशारा दिला होता. मध्यरात्रीपर्यंत हमासने ओलिसांची सुटका न केल्यास गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाई करू, असा इशारा इस्रायली सैन्य दलाने दिल्याचे वृत्त इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी शनिवारी दिले होते. त्यानंतर कतारच्या मध्यस्थीने ओलिसांची सुटका करण्यास सुरुवात झाली.

गाझाला मदत म्हणून पुरवल्या जाणार्‍या विविध अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आल्याने ओलिसांची सुटका करण्यात विलंब झाल्याचे कारण हमासतर्फे दिले गेले. इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसाठी मान्य केलेल्या अटींचे पालन न केल्यास तसेच, युद्धग्रस्त गाझा आणि तेथील रुग्णालयांना मदत न केल्यास ओलिसांची सुटका रोखली जाईल, असे हमासच्या अल-कसाम ब्रिगेड्सने यापूर्वी सांगितले होते.

Exit mobile version