वक्फ कायद्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. या हिंसाचारात गोविंद दास आणि त्यांचा मुलगा चंदन दास यांची हत्या करण्यात आली. या हिंसाचारादरम्यान, दास कुटुंबियांतील १३ सदस्यांनी आपले प्राण वाचवले आणि झारखंडला पळून गेले. दरम्यान, कुटुंबाने संपूर्ण हल्ल्याची घटना सांगितली आहे.
मुर्शिदाबाद सोडल्यानंतर या कुटुंबाने झारखंडमधील साहिबगंजच्या राजवाड्यात आश्रय घेतला. या कुटुंबातील सदस्य हृदय दास यांनी सांगितले की, १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुमारे ५०० दंगलखोरांनी त्यांच्या काका आणि भावाला दुकानाबाहेर ओढले आणि धारदार शस्त्रांनी त्यांची निर्घृण हत्या केली. यानंतर, दंगलखोरांनी बाजारपेठेतील सर्व दुकाने आणि आजूबाजूच्या परिसरातील ७० ते ८० घरांची तोडफोड केली. एवढेच नाही तर महिलांशीही गैरवर्तन करण्यात आले. या घटनेनंतर दास कुटुंब अजूनही भयभीत आहे. हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करत आहे.
हे ही वाचा :
“वक्फ मालमत्ता तृणमूल नेत्यांच्या, म्हणूनच बंगालमध्ये हिंसाचार”
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी १२५ वर्षे जुन्या कराराचा वापर; काय आहे करार?
अयोध्येत राम मंदिराचे काम ९९ टक्के पूर्ण
हवामान विभागाने पुन्हा दिला हिट वेव्हचा अलर्ट
दरम्यान, मुर्शिदाबाद झालेल्या हिंसाचारात शेकडो जखमी झाले, तर अनेक लोकांना आपले घर सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागला. मुर्शिदाबादमध्ये सुमारे ३०० सीमा सुरक्षा दलाचे जवान आधीच तैनात आहेत आणि केंद्राने सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी केंद्रीय दलांच्या पाच अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत. हिंसाचारात आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांना आग लावली, रस्ते रोखले आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले. हिंसाचारानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.