देशात बेकायदेशीर बांगलादेशी-रोहिंग्याविरुद्ध मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली असून अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अनेक घुसखोरांना अटक केली आहे, करत आहेत. अटक करण्यात आलेल्यांची कागदपत्रे तपासली असता, येथे मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे समोर आले आहे.
राज्यातही अशा घुसखोरांवर महाराष्ट्र पोलीस कारवाई करत आहेत. अशा घुसखोरांविरुद्ध राज्यात भाजपा नेते किरीट सोमय्या वारंवार आवाज उठवत आहेत. राज्यातील अनेक तहसील कार्यालयांना भेट देवून त्यांनी बोगस जन्मप्रमाण पत्र घोटाळा बाहेर काढला आहे. अशाच एका कारवाई दरम्यान विक्रोळीत १३ बांग्लादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. किरीट सोमय्यांनी ट्वीटकरत याबाबत माहिती दिली.
किरीट सोमय्या ट्वीटकरत म्हणाले, आज (२७ एप्रिल) सकाळी ११ वाजता पोलिसांसह आम्ही विक्रोळी मार्केटला भेट दिली आणि तिथे असे डझनभर बांग्लादेशी फेरीवाले आढळले. विशेष म्हणजे, या बांगलादेशींच्या आधार कार्डवर जन्मतारीख ०१/०१ म्हणजेच ०१ जानेवारी लिहिलेली आहे आणि या सर्व आधार कार्डवर साहेबगंज, झारखंडचा पत्ता आहे. या सर्व बांग्लादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे. असे अनेक घुसखोर राज्यात असल्याची माहिती आहे.
बांगलादेशींची नाव आणि जन्मतारीख :
जियाउल शेख ०१ /०१/१९८०
अयुब शेख ०१/०१/१९७६
मनोरूल शेख ०१/०१/१९९५
सायम शेख ०१/०१/२००३
नईम शेख ०१/०१/२००३
सामून शेख ०१/०१/२००३
रफीकुल शेख ०१/०१/१९८८
जहाँगीर शेख ०१/०१/२००७
नसीमा बिबी ०१/०१/१९८३
मैनुद्दीन शेख ०१/०१ /२०००
बरीउल शेख ०१/०१/२००३
हलीम शेख ०१/०१/२००६
कासूद शेख ०१/०१/२००४
विक्रोळी पोलिस स्टेशनने 13 बांग्लादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतले
आज 27 एप्रिल सकाळी 11 वाजता पोलिसांसह आम्ही विक्रोळी मार्केटला भेट दिली आणि तिथे असे डझनभर बांग्लादेशी फेरीवाले आढळले, ज्यांच्या आधार कार्डवर जन्मतारीख 01/01… म्हणजेच 01 जानेवारी लिहिलेली आहे
सर्व आधार… pic.twitter.com/PBgFzqJcTB
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 27, 2025