बारावीत पुन्हा मुलीच अव्वल; ९४ टक्के निकाल

बारावीत पुन्हा मुलीच अव्वल; ९४ टक्के निकाल

यंदाचा बारावीचा निकाल बुधवार,८ जून रोजी जाहीर झाला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणेच कोकणाने बाजी मारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे मुलींनीच यावर्षी बाजी मारली आहे. यावर्षी राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत ५.३१ टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हाच निकाल ९९.५३ टक्के लागला होता. तर २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

राज्यातून एकूण १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील बोर्डाच्या नऊ विभागांपैकी कोकण विभाग अव्वल आला आहे. कोकणाचा ९७.२१ टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.९१ टक्के लागला आहे. तसेच पुणे विभागाचा निकाल ९३.६१ टक्के, नागपूर विभागाचा ९६.५२ टक्के, औरंगाबाद ९४.९७ टक्के, कोल्हापूर विभाग ९५.७ टक्के, अमरावती ९६.३४ टक्के, लातूर ९५.२५ टक्के आणि नाशिक विभागाचा निकाल ९५.०३ टक्के लागला आहे. राज्यातील ६ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण पटकावले आहेत.

हे ही वाचा:

‘शिवसेनेची बी टीम कोणती हे स्पष्ट’

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून ‘ही’ पाच नाव निश्चित

हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कर्नाटकातून अटक

७५ किमीचा रस्ता पाच दिवसात बांधून भारताने रचला विक्रम

यावर्षीच्या बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागातून विद्यार्थिनींचा निकाल ९५.३५ टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल ९३.२९ टक्के लागला आहे. मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

Exit mobile version