बारावी बोर्डाच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या पेपरमध्येच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी झालेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये एक प्रश्न चुकीचा होता. मात्र, आता या प्रश्नाचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
इंग्रजीच्या पेपरमध्ये एक गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा एक गुण विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. इंग्रजीच्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्न एक मधील ए ५ प्रश्नाला सूचना प्रिंट झाला नाही. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे त्या विद्यार्थ्यांना पूर्ण क्रेडिट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील ९ हजार ६३५ परीक्षा केंद्रावर १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रांवरती कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. ५ आणि ७ मार्चला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले असून ते पेपर ५ आणि ७ एप्रिलला होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. मागच्या दोन वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा सवय लागली होती. परंतु गुणवत्ता घसरत असल्याची तक्रार आणि कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा हा मोठा निर्णय
मणिपूरमध्ये नेत्याच्या घरावर बॉम्ब हल्ला
युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी
…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न
दोन वर्षाच्या काळात परीक्षा ऑफलाईन झाल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असेल त्यामुळे ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.