‘१२ वी फेल’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दमदार कमाई करत असताना आता ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत देखील या सिनेमाचा समावेश झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिस गाजवत असलेल्या या सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विक्रांत मेस्सीची या सिनेमात मुख्य भूमिका असून ’१२ वी फेल’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. प्रमोशन न करता हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. विधू विनोद चोप्रा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा एक कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेला सिनेमा आहे. शिवाय कमी स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. पण तरीही प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला आहे.
’१२ वी फेल’ हा सिनेमा २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने ४५ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अनुराग पाठक यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. आयपीएस मनोज कुमार यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाची गोष्ट खूपच भावनिक आहे.
हे ही वाचा:
अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!
अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली
उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला कोल इंडिया
खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या दोन शूटर्सला ठोकल्या बेड्या
दरम्यान ’१२ वी फेल’ या सिनेमाचा ऑस्करच्या शर्यतीत समावेश झाला आहे. विक्रांतने स्वत: यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे. विक्रांत म्हणाला की, “१२ वी फेल हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल यावर आमचा विश्वास होता. पण प्रेक्षकांचा या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद ही आमच्यासाठी नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. अनेक प्रेक्षक दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा हा सिनेमा पाहायला येत आहेत. प्रेक्षकांना फक्त मनोरंजन नको आहे तर उत्तम कथानकही हवं आहे हे यावरुन सिद्ध होतं,”