गुजरातमध्ये कारखान्याची भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू

गुजरातमध्ये कारखान्याची भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एका कारखान्याची भिंत कोसळून तब्बल १२ मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. मोरबी जिल्ह्यातील हलवाद जीआयडीसी येथे हा अपघात घडला असून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. साधारण ३० कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. ढिगाऱ्याखाली आणखी कुणी अडकले आहे का याचा शोध घेण्यात येत आहे.

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील हलवड औद्योगिक परिसरात सागर सॉल्ट पॅकेजिंगचा कारखाना आहे. या कारखान्याची भिंत दुपारी १२ च्या सुमारास अचानक कोसळली. यात १२ मजुरांचा मृत्यू झाल्याचे राज्याचे कामगार व रोजगार मंत्री ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले आहे. स्थानिकांनी तातडीने मदतकार्याला सुरुवात केली होती. त्यानंतर आता जेसीबीने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटनेची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

रशियाचा मोठा विजय, मारियुपोलवर ताबा

पहिल्यांदा तक्रार करू…पण कारवाई झाली नाही तर सोडणार नाही

आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मोरबी येथील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आली आहे. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीदेखील भिंत कोसळून मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

Exit mobile version