छत्तीसगडमध्ये पोलिसांनी पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १२ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्याची कामगिरी पोलिसांनी केली असून ऐन निवडणुकीच्या वातावरणात झालेली ही कारवाई खूप महत्वाची आहे. गांगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह बिजापूर येथे आणण्यात आले आहेत.
शुक्रवारी गांगालूर परिसरातील जंगलामध्ये नक्षलवाद्यांचे एसजेसी लेंगु, त्यांचे प्रमुख पापराव, दरभा विभागाचे चैतू यांच्यासह आणखी काही मोठ्या नक्षलवादी तेथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नक्षलवादी आहेत का, याची खात्री केली. त्यानंतर दंतवाडा, बिजापूर आणि सुक्मा जिल्ह्यातून डीआरजी, सीआरपीएफ, कोबरा आणि बस्तर फाईटर यांची टीम तयार करून त्यांना तैनात करण्यात आले होते. सुमारे १२०० जवानांची फौज या कारवाईसाठी तैनात करण्यात आली होती. त्यांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
हेही वाचा..
निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे जाणार अज्ञातवासात
‘करो या मरो’ सामन्यात ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी
भाजपाचे तिकीट नाही, पण वरुण गांधी प्रचारात भाग घेतील!
सलीम मलिकची विशेष रजा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ६ वाजता नक्षलवाद्यांचा सामना पोलिसांबरोबर झाला. मोठ्या प्रमाणावर गोळीबार दोन्ही बाजूनी झाला. ही धुमश्चक्री सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरु होती. या धुमचक्रीनंतर १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह, मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.