छत्तीसगढ मधील दुर्ग येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे.बस दरीत कोसळल्याने १२ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तसेच अनेकजण झाले आहेत.सुमारे ४० जणांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन सुमारे ५० फूट दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे.
छत्तीसगढ राज्यातील रायपूर – दुर्ग रोडवर हा अपघात झाला आहे.या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.जखमींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. एसपी जितेंद्र शुक्ला यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, कामगारांना त्यांच्या शिफ्टनंतर घरी घेऊन जात असताना बसला अपघात झाला.बसचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दरीत कोसळल्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
भारतात यंदा मान्सून राहणार सामान्य
१० वर्षांत सेन्सेक्स २५ हजारांवरून ७५ हजारांवर!
‘इस्रायलला शस्त्रे पाठवणे ब्रिटन थांबवणार नाही’
जिल्हा दंडाधिकारी ऋचा प्रकाश चौधरी यांनी सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या १४ जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशी केली जाईल आणि त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.ते म्हणाले की, छत्तीसगडच्या दुर्गमधील बस दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी, मी सदिच्छा व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.