सोलापूर जिल्ह्यात विचित्र घटना घडली आहे. सोलापूर-मंद्रूप बायपास रस्त्यावरील पुलावरून हरणांचा कळप जात होता. वाहनांची ये-जा सुरु होती. ही सर्व हरणे रास्ता ओलांडण्याचा बेतात होती. पण रस्ता ओलांडण्याआधीच रस्त्यावरील वाहतूक वाढली. त्यामुळे ही सर्व हरणे घाबरली. मागून येणारी वाहने आणि कुत्र्यांना घाबरून या कळपाने थेट पुलावरून खाली उड्या मारल्या. पण घात झाला. या कळपातील हरणे पुलाखालच्या दगडावर जाऊन आपटली.
सोलापूर शहरालगतच्या शिवाजी नगर परिसरात असलेल्या हिरजच्या माळरानावरून काळवीटांचा कळप येत होता. उड्डाण पुलावर हा कळप आला. त्यावेळी त्यावेळी पुलावर मागून येणारी वाहने आणि कुत्र्याला घाबरून या कळपाने उड्डाण पुलावरून थेट खाली खाली उड्या मारल्या. पुलाखालील दगडवर आदळल्याने सर्व हरणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत १२ हरणांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
४०० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अमर मूलचंदानी ईडीच्या ताब्यात
शिवाजी पार्कवर हिंदू .. आझाद मैदानात लिंगायत समाज आक्रमक
शिवाजी पार्कवर हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी हिंदू समाज एकवटला
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर वेगाने येणारी वाहने आणि वाहतूक पाहून हरणांचा कळप घाबरला आणि त्याने जवळच्या पुलावरून उडी मारली. या अपघातात सर्व बारा हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सर्व हरणांचे मृतदेह महामार्गावरून बाजूला करण्यात आले. पुलावरून उडी मारून अनेक हरणे जखमी झाली, नंतर त्यांचा मृत्यू झाला. जखमी हरणांना तातडीने उपचारांसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमागील कारणांचाही तपास सुरू करण्यात आला आहे.