28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषम्युकर मायकोसिसने पिंपरी चिंचवडला वेढले

म्युकर मायकोसिसने पिंपरी चिंचवडला वेढले

Google News Follow

Related

महाराष्ट्रात कोविड बरोबरच म्युकरमायकॉसिसने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला थोड्या प्रमाणात असणारे या आजाराचे रुग्ण एकदम हजारोंच्या घराच पोहोचले होते. त्याबरोबरच त्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे. पिंपरी- चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात १२ रुग्णांचा म्युकरमायकॉसिसने मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोविड पाठोपाठ म्युकरमायकॉसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे १२ रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात ७० रुग्ण दाखल झाले आहेत.  यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज ३ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:

केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनी उघडले

रेमडेसिवीरचे देशातील उत्पादन १ कोटी १९ लाख मात्रा प्रतिमहिना

यावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार आहे का?

जम्मू- काश्मिरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र, महापालिकेकडे नेमके किती खासगी रुग्णालयं आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ सकली नाही.

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाच्या रुग्णांत वाढ

म्युकरमायकोसिस ह्या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारपुढे नवीन आव्हान उभे ठाकले. त्याचा सामना करण्यासाठी डॉ. आशिष भुमकर यांच्यासोबत एक खास टीम तयार करण्यात आली आहे. यात डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टरांची टीम एकत्र करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांच्या पुढाकाराने हे संकट आपण सगळे मिळून नक्की परतवून लावू, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

रुग्णांच्या नाकाची एंडोस्कोपी करावी

म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे प्रामुख्याने मधुमेहग्रस्त व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी दिसून येतात. त्यामुळे हा आजार वेळीच टाळायचा असेल तर अशा रुग्णाची वेळच्या वेळी साखरेची पातळी चेक करायला हवी, असं मत राज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केलं. तसेच जे रुग्ण २१ दिवसांहून जास्त काळ रुग्णालयात राहून गेले आहेत, अशा रुग्णांच्या नाकाची एंडोस्कोपी करावी, अशी सूचना त्यांनी मांडली.

औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहर

औरंगाबादमध्ये सध्या कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस हा आजार थैमान घालताना दिसत आहे. म्युकरमायकोसिसमुळे औरंगाबादमध्ये गेल्या दीड महिन्यांत १६ जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २०१ रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. आतापर्यंत या आजारामुळे ११३ जणांनी आपले डोळे गमावले आहेत. राज्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबादेत आहेत. सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण सुद्धा औरंगाबादमध्येच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा