क्रिकेटचा चेंडू प्रायव्हेट पार्टला लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू!

पुण्यातील घटना

क्रिकेटचा चेंडू प्रायव्हेट पार्टला लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू!

पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना प्रायव्हेट पार्टला चेंडू लागल्याने एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत.शौर्य असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत.परंतु, खेळ-खेळताना तेवढी काळजी घेणेही गरजेचे आहे.कारण यामध्ये शरीराला मोठी इजा होण्याची शक्यता असते.तशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे.क्रिकेट खेळत असताना एका ११ वर्षीय मुलाच्या प्रायव्हेट पार्टला चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे.शौर्य असे मुलाचे नाव असून तो आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना त्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

“दोन वर्षापूर्वी करेक्ट कार्यक्रम केला; आता फक्त विकास हाच अजेंडा”

‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेवरून सागरी प्राण्याला मिळाली नवी ओळख!

गडचिरोली पोलिसांकडून कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी, ३ क्लेमोर स्फोटके नष्ट

‘टी -२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट’

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.शौर्य गोलंदाजी करत असताना फलंदाजाने चेंडू थेट त्याच्या दिशेने मारला. फलंदाजाने मारलेला चेंडू थेट शौर्यच्या प्रायव्हेट पार्टला लागला आणि शौर्य जमिनीवर आदळला.या घटनेनंतर त्याचे सर्व मित्र पुढे सरसावले आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर शौर्यला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून शौर्यला मृत घोषित केले.दरम्यान, या घटनेमुळे शौर्यच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version