पावसाने उत्तराखंडला चांगलेच झोडपले असून या परिसरात १८ ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली होती. हिमवृष्टीमुळे पर्यटक, पोर्टर, गिर्यारोहक अशा १७ जणांशी असलेला संपर्क तुटला होता. यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. भारताच्या वायुदलाने लमखागा पास येथे १७ हजार फुटांच्या उंचीवर शोधकार्य सुरू केले आहे. या सर्वांना शोधण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत ११ मृतदेह सापडले आहेत.
Bodies of 7 trekkers recovered, 2 rescued and 2 remain missing out of a group of 11 trekkers which had gone missing in Harsil. 5 more bodies of trekkers from another group of 11 trekkers which went missing near Lamkhaga Pass also retrieved: Uttarakhand DGP Ashok Kumar
— ANI (@ANI) October 23, 2021
उत्तराखंडच्या लिमखागा खिंडीत ट्रेकिंगला गेलेल्या ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. एकूण १७ गिर्यारोहक ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यापैकी ४ जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर २ जण अद्याप बेपत्ता आहेत. गिर्यारोहकांना शोधण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) उत्तराखंडच्या उंच टेकड्यांवर अजूनही शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
हे ही वाचा:
…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन
‘अविघ्न पार्क’ अग्नितांडवानंतर पालिकेला जाग; अग्निशमन यंत्रणेचा घेणार आढावा
काँग्रेसच्या सभेबाहेर शेतकरी सांगतात आमचे मत भाजपालाच
संघाची बदनामी जावेद अख्तरांना भोवणार? फौजदारी तक्रार दाखल
या परिसरात दळणवळणाचे कुठलेही साधन नसल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत. एसडीआरएफच्या एका टीमने पायीच शोध मोहिम सुरू केली होती. दुसरी टीम हेलिकॉप्टरने त्यांचा शोध घेत होती. एसडीआरएफच्या पथकांना सॅटेलाइट फोनद्वारे माहिती दिली जात होती. एसडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी क्षणोक्षणी बचाव कार्याचे निरीक्षण करत होते आणि टीमना आवश्यक निर्देश देत होते.
१७ गिर्यारोहकांपैकी दोन अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी हवाई दलाचे एएलएच हेलिकॉप्टर पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करेल.