भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम

भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरुवारी भारतीय संघाने श्रीलंकेला तब्बल ३०२ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयाचा शिल्पकार ठरला तो, तेज गोलंदाज मोहम्मद शामी. त्याने पाच विकेट घेऊन अनेक विक्रम नावावर केले. अशा प्रकारे या सामन्यात ११ विक्रम झाले.

भारताने श्रीलंकेवर मात केल्याने उपांत्य फेरीत प्रवेश करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शामी याने विश्वचषकात सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट घेणारा गोलंदाज असा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. तसेच, विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतील गोलंदाज ठरला आहे.

भारतीय संघाने श्रीलंकेला ३५८ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघाने श्रीलंकेला अवघ्या ५५ धावांतच गुंडाळले. त्यामुळेही क्रिकेट इतिहासातील अनेक विक्रम मोडले आहेत.

विश्वचषक स्पर्धांत सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट

श्रीलंकेची आतापर्यंतची तिसरी सर्वांत कमी धावसंख्या

एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिकवेळा चारपेक्षा अधिक विकेट

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच विकेट घेणारे भारतीय

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारे गोलंदाज

विश्वचषक स्पर्धेत आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्यदेशाने केलेली सर्वांत कमी धावसंख्या

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांनी विजय

भारताविरोधात एकदिवसीय सामन्यात सर्वांत कमी धावसंख्या

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय

विश्वचषक स्पर्धेत एका डावात सर्वाधिक षटकार खेचणारे भारतीय

विश्वचषक स्पर्धेत विनाशतक भारताने उभारली मोठी धावसंख्या

Exit mobile version