27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषभारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम

भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम

Google News Follow

Related

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरुवारी भारतीय संघाने श्रीलंकेला तब्बल ३०२ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयाचा शिल्पकार ठरला तो, तेज गोलंदाज मोहम्मद शामी. त्याने पाच विकेट घेऊन अनेक विक्रम नावावर केले. अशा प्रकारे या सामन्यात ११ विक्रम झाले.

भारताने श्रीलंकेवर मात केल्याने उपांत्य फेरीत प्रवेश करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शामी याने विश्वचषकात सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट घेणारा गोलंदाज असा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. तसेच, विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतील गोलंदाज ठरला आहे.

भारतीय संघाने श्रीलंकेला ३५८ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघाने श्रीलंकेला अवघ्या ५५ धावांतच गुंडाळले. त्यामुळेही क्रिकेट इतिहासातील अनेक विक्रम मोडले आहेत.

विश्वचषक स्पर्धांत सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट

  • मोहम्मद शामी- सातवेळा
  • मिचेल स्टार्क – सहावेळा
  • इमरान ताहिर- पाचवेळा

श्रीलंकेची आतापर्यंतची तिसरी सर्वांत कमी धावसंख्या

  • ४३ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्ल २०१२
  • ५० विरुद्ध भारत, कोलंबो २०२३
  • ५५ विरुद्ध भारत, मुंबई २०२३
  • ५५ विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजा १९८६

एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिकवेळा चारपेक्षा अधिक विकेट

  • ४- शाहिद आफ्रिदी, २०११
  • ४- मिचेल स्टार्क, २०१९
  • ३- मोहम्मद शामी, २०१९
  • ३- एडम जाम्पा, २०२३
  • ३- मोहम्मद शामी, २०२३

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच विकेट घेणारे भारतीय

  • ४ – मोहम्मद शामी
  • ३- जवागल श्रीनाथ
  • ३- हरभजन सिंग

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारे गोलंदाज

  • तीनवेळा- मिचेल स्टार्क
  • तीनवेळा- मोहम्मद शामी

विश्वचषक स्पर्धेत आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्यदेशाने केलेली सर्वांत कमी धावसंख्या

  • ५५- श्रीलंका विरुद्ध भारत, वानखेडे, २०२३
  • ५८- बांग्लादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, मीरपूर २०११
  • ७४- पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, ऍडलेड, १९९२

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांनी विजय

  • ३१७- भारत विरुद्ध श्रीलंका, तिरुवनंतपूरम, २०२३
  • ३०९- ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड, दिल्ली, २०२३ (विश्वचषक)
  • ३०४- झिम्बाब्वे विरुद्ध यूएई, हरारे २०२३
  • ३०२- भारत विरुद्ध श्रीलंका, वानखेडे २०२३
  • २९०- न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड, अबेरदीन २००८
  • २७५- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ २०१५ (विश्वचषक)

भारताविरोधात एकदिवसीय सामन्यात सर्वांत कमी धावसंख्या

  • ५०- श्रीलंका, कोलंबो २०२३
  • ५५- श्रीलंका, मुंबई २०२३ (विश्वचषक)
  • ५८- बांग्लादेश, मीरपूर २०१४
  • ६५- झिम्बाब्वे, हरारे २००५
  • ७३- श्रीलंका, तिरुवनंतपूरम, २०२३

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय

  • मोहम्मद शामी- ४५
  • जहीर खान – ४४
  • जवगल श्रीनाथ – ४४
  • जसप्रीत बुमराह – ३३
  • अनिल कुंबळे – ३१

विश्वचषक स्पर्धेत एका डावात सर्वाधिक षटकार खेचणारे भारतीय

  • ७ – सौरव गांगुली विरुद्ध श्रीलंका, टॉन्टन, १९९९
  • ७ – युवराज सिंग विरुद्ध बरमुडा, पोर्ट ऑफ स्पेन, २००७
  • ६- कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स, १९८३
  • ६- रोहित शर्मा विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद, २०२३
  • ६- श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका, वानखेडे, २०२३

विश्वचषक स्पर्धेत विनाशतक भारताने उभारली मोठी धावसंख्या

  • ३५७/८- भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई २०२३
  • ३४८/८- पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, नॉटिंघम, २०१९
  • ३४१/६- दक्षिण आफ्रिका विरुद्ध यूएई, वेलिंग्टन, २०१५
  • ३३९/६- पाकिस्तान विरुद्ध यूएई, नेपियर, २०१५
  • ३३८/५- पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, स्वानसी, १९८३
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा