लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी, उद्या २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथे आपण येत असून या कार्यक्रमात ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या एक्स या समाजमाध्यमावरील खात्यावरून दिली आहे.
ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी २५०० कोटी रुपयांचा निधी जारी केला जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदेशात म्हटले आहे.
हेही वाचा..
मुंबईहून हैद्राबादला जाणारं हेलीकॉप्टर पुण्यात कोसळलं, चार जण जखमी !
जालन्यात वितळलेले लोखंड अंगावर पडून २२ जण जखमी
फेस्टिव्हल ऑफ डायव्हर्सिटी दरम्यान चाकू हल्ल्यात तीन ठार
आसाम सामुहिक बलात्कार: तलावात बुडून मृत्यू झालेल्या आरोपीचा मृतदेह गावात दफन करू देणार नाही
उद्या जळगावमध्ये होत असणाऱ्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तिथे तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दौऱ्यात काय बोलणार ? याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.