बांगलादेशातील सत्तापालटानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारचा शपथ सोहळा पार पडला आहे. शेजारी देशात सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशला लागून असलेल्या सर्व सीमेवर सुरक्षा सतर्कतेचा इशारा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मेघालय सीमेवर भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या ११ बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे.
घुसखोरी करणाऱ्या ११ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना राज्य पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असे प्रवक्त्याने सांगितले. यापूर्वी, बीएसएफने बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) च्या मदतीने शुक्रवारी (९ ऑगस्ट २०२४ ) पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात बांगलादेशच्या सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.
बांगलादेशातील परिस्थितीबाबत आसाम पोलीस सतर्क
बांगलादेशातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, आसाम पोलीस देखील भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्टवर आहेत, जेणेकरून कोणीही बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश करू नये. आसामचे डीजीपी म्हणाले की, केंद्राने निर्देश जारी केले आहेत की बांगलादेशातून कोणत्याही व्यक्तीला भारतात अवैधरित्या प्रवेश दिला जाणार नाही. बीएसएफ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, भारतीय जवान सीमेच्या रक्षणासाठी अतूट वचनबद्धतेने उभे आहेत. याशिवाय, बीएसएफ मानवी पद्धतीने परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत जागरूक आहे.
हे ही वाचा..
वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रद्दच करा!
‘माझ्या नादाला लागू नका’, माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे कळणार नाही !
मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगेसोयऱ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत !
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ‘ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ पुरस्काराने सन्मानित !
दरम्यान, बांग्लादेशात सुरु असलेल्या हिंसाचारात हिंदूंना मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आले आहे. हिंदूंची मंदिरे, घरांची तोडफोडकरून चोरीच्या घटना घडत आहेत. तसेच अनेक हिंदूंची हत्या देखील केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी एका हिंदू पत्रकाराला खांबाला लटकावून त्याला मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली होती.