अकरावीच्या विद्यार्थ्यांचे आता नेमके काय होणार असाच प्रश्न पालक आणि विद्यार्थी वर्गाला आता पडलेला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू झाली. परंतु वेबसाइट बंद असल्यामुळे काही काळ विद्यार्थ्यांना नोंदणी करताच आली नाही. त्यात आता दुसरा एक नवा मुद्दा समोर आलेला आहे.
ऐच्छिक सीईटी आहे असे म्हणताना ११ वी प्रवेशासाठी सीईटी दिली आहे, त्याच विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. असे आता शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसोबत पालकही चिंतेत आहेत. सीईटी न देणारे अनेक विद्यार्थी आता सीईटीची तयारी कशी करायची याच गोंधळात आहेत. त्यामुळेच आता नामांकित महाविद्यालयात प्रवेश कसा मिळणार म्हणून विद्यार्थी तसेच पालक चिंतेत आहेत.
सीईटीच्या नावाखाली बाजारामध्ये आज अनेक खासगी क्लासेसचे पेवही फुटताना दिसत आहे. तसेच खासगी प्रकाशकांचे प्रश्नसंचही उपलब्ध आहेत. त्यामुळे काहींना संच न मिळाल्यानेही गोंधळाचे वातावरण आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला राज्यपालांची टाचणी
…म्हणून काँग्रेस नेत्याला केले समर्थकांनीच ट्रोल
राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या वर आहेत, हे नवाब मलिकांना ठाऊक नाही काय?
भारतातील कम्युनिस्ट पक्षांआडून चीन खेळत होता डावपेच
कोरोनामुळे राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. अकरावीच्या प्रवेशांसाठी राज्य मंडळामार्फत २१ ऑगस्टला सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. ही सीईटी विद्यार्थांना ऐच्छिक असल्याचे शासन निर्णयात नमूद केले होते, परंतु, आता निर्णय बदलण्यात आल्यामुळे शेवटच्या क्षणी पालक विद्यार्थी चिंतेत आहेत.
पुणे, मुंबईसारख्या शहरांत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी चुरस असते. त्यामुळेच शासनाच्या निर्णयानुसार सीईटी अनिवार्य ठेवल्यास मात्र खूपच गोंधळ आणि तणावही वाढणार आहे.