दहावीच्या विद्यार्थ्यांचे वाजलेत ‘बारा’

दहावीच्या विद्यार्थ्यांचे वाजलेत ‘बारा’

डेटा गहाळ झाल्याने बसला धक्का

राज्य सरकार दहावीच्या परीक्षा न घेण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने दहावीचे मूल्यांकन ९ वीच्या गुणांच्या आधारावर करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु निर्णय जाहीर केल्यानंतरच अनेक नवनवीन गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या आहेत. एकीकडे शाळांना मूल्यांकनासाठी ९ वीच्या गुणांचाही विचार करायचा आहे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. गेल्या वर्षी तब्बल १९ लाख विद्यार्थांनी नववीची परीक्षा दिली. यातील जवळपास ७८ हजार ६४३ विद्यार्थ्यांचा डेटाच गहाळ झालेला आहे.

एसएआरएएल सॉफ्टवेयरमधून हा डेटा गहाळ झालेला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एसएआरएएल म्हणजेच अहवाल कार्डसह सर्व शाळा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रशासकीय आणि शैक्षणिक डेटा संचयित करतो. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक १२ हजार  ६१३ विद्यार्थ्यांचा डेटा गहाळ झालेला आहे. तर भंडारा जिल्ह्यामधील डेटा गहाळ होण्याची संख्या सर्वाधिक कमी म्हणजे ८० इतकी आहे.

हे ही वाचा:

शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांचा कारावास

मेट्रो घडवणारे फडणवीस राहिले बाजूला, बिघडवणारे मुख्यमंत्री ठाकरे उद्घाटन करत फिरतायत

झुंबड गोळा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई कधी?

अशोक चव्हाणही नितीन गडकरींच्या प्रेमात

विद्यार्थ्यांच्या नववीचा डेटा गहाळ झालेला असताना आता या त्यांचे मूल्यांकन कसे होणार? हा गहन प्रश्न शाळांसमोर उभा राहिलेला आहे. एकीकडे परीक्षा होणार की नाही,  हा मुद्दा चर्चेत असताना आता हा गहाळ झालेला डेटा म्हणजे शिक्षण विभागावर नामुष्कीची वेळच आलेली आहे असे म्हणायला हरकत नाही.

गहाळ झालेल्या विद्यार्थांच्या डेटाविषयी राज्य सरकारने म्हटले की, शाळांनी या विद्यार्थ्यांचे एकूण आकलन तपासून गुण द्यावेत. तसेच शिक्षण विभागाने सॉफ्टवेअरमधून गहाळ झालेल्या डेटाविषयी आता अधिक तपशीलात जाऊन माहिती शोधण्याची तसदी घेतलेली आहे.

Exit mobile version