दहावीचे विद्यार्थी आणि पालक ज्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करत होते, त्या दहावीच्या मुलांचा निकाल उद्या म्हणजे १६ जुलै २०२१ रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजता हा निकाल पाहता येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मुलांचा दहावीचा निकाल मूल्यमापनाच्या आधारे लावण्याचा निर्णय सरकारने घेतला. दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी एक सूत्र ठरवण्यात आले होते.
हे ही वाचा:
गोवंडीतील उद्यानाला टिपूचे नाव द्यायला शिवसेनेचा छुपा पाठिंबा
लवकरच मोदी सरकारकडून एलआयसी आयपीओ बाबत निर्णय?
गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या संपत्तीवर टाच
मोदींकडून वाराणसीत १५०० कोटींची विकासकामे
हा दहावीचा निकाल www.mahresult.nic.in तसेच www.sscresult.mkcl.org आणि www.maharashtraeduction.com या वेबसाईटवर पाहता येणार आहे. शिवाय, मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जायचे आहे, तिथे मुलांना SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यास सीट नंबर टाइप करावा लागेल. नंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे टाकावी लागतील. तेव्हा तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल पाहिल्यानंतर तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येईल.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू होण्याआधीच दहावीची परीक्षा आटोपली होती. त्यामुळे निकाल लावणे शक्य झाले होते. पण यावर्षी परीक्षाच न झाल्यामुळे मुलांचे निकाल कसे लागणार हा प्रश्न होता. अखेर बऱ्याच चर्वितचर्वणानंतर सरकारने मूल्यमापनाचे निकष ठरविले. त्याच आधारावर आता हा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे हा निकाल कसा लागतो, याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.
10th cha result