ठरलं! दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर होणार

ठरलं! दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंडळाने बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर केल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांना होती. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. राज्यात दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या दरम्यान पार पडली होती. यंदा १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या वेबसाईटवर विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकणार आहेत. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये गन पावडरच्या कारखान्यात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

पोर्शे अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याने पुण्यातील दोन पोलिसांचे निलंबन!

‘नवीन पटनायक यांना व्हीके पांडियन यांनी ओलिस ठेवले आहे’

केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत

दहावीच्या परीक्षेचे मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत आयोजन केलं जातं. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालाच्या टक्क्यात वाढ झालेली पाहायला मिळाली असून यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. कोकण विभाग निकालात अव्वल ठरला आहे.

Exit mobile version