बारावी परीक्षा १५; तर दहावी ४ मार्चपासून

बारावी परीक्षा १५; तर दहावी ४ मार्चपासून

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्याचे आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्चमध्ये सुरू होतील. बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे, तर दहावीची परीक्षा १५ मार्चला सुरु होणार आहे.

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे ही माहिती सांगितली की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी वी इयत्ता बारावी ( २०२१-२०२२) च्या बोर्ड परीक्षांचे विषयनिहाय वेळापत्रक जारी केले आहे. परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक अधिकृत वेबसाइट- mahahsc.in वर उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.”

विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सरकारचे प्राधान्य असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते. “विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळावे यासाठी आम्ही मुख्याध्यापक,शिक्षक आणि तज्ज्ञ यांच्याशी मूल्यमापन पद्धती आणि परीक्षेचे वेळापत्रक याबाबत चर्चा केली. सर्व परीक्षा कोविड-19 सुरक्षा नियमांचे पालन करून घेतल्या जातील त्यासाठी अनेक सूचनांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. असे गायकवाड म्हणाल्या.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांना मुख्यमंत्री मदत निधीत भरावे लागणार ५० हजार

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कृतीशील अनुयायी प्रताप वेलकर कालवश

दिल्लीच्या मोहल्ला कमिटीच्या औषधांमुळे तीन मुले दगावली; केजरीवाल अडचणीत

शत्रुघ्न सिन्हांचे कुटुंबीय आता ईडीच्या रडारवर येणार?

 

इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहेत, तर बारावीच्या परीक्षा ३० मार्चला संपतील. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, ग्रेड, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.
बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तर, दहावीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

Exit mobile version