दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तारखा जाहीर

दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून असणार आहे तर इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घोषित केलेल्या तारखांनुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ या दरम्यान होणार आहे. तर, दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या काळात होणार आहे. फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

कर्णफुलासाठी त्याने केली वृद्धेची हत्या; गुन्ह्याचा उलगडा झाला

कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

वानखेडे स्टेडियम वर्ल्डकपदरम्यान आतषबाजीने रंगणार नाही

भरधाव दुचाकीची १६ वर्षीय मुलीला धडक; बसनेही चिरडले

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या निवेदनात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) सर्वसाधारण आणि द्विलक्षी अभ्यासक्रम परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ या काळात होणार आहे. तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ आणि १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

Exit mobile version