इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!

व्हिडिओ आला समोर

इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!

इस्रायल सिक्युरिटीज अथॉरिटीकडून (ISA) सोमवारी एक व्हिडिओ जारी करण्यात आला.या व्हिडिओ हमासच्या दहशतवाद्यांनी सांगितले की, इस्रायली नागरिकांचे अपहरण केल्यास त्यांना दहाहजार युएसडॉलर व अपार्टमेंटमध्ये एक रूम देण्यात येईल. ७ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या इस्रायल आणि हमासच्या युद्धात दक्षिण इस्रायलमध्ये हमासकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याची कबुली हमासच्या दहशतवाद्यांनी व्हिडिओमध्ये दिली.

इस्रायलमधील नागरिकास गाझामध्ये आणल्यास पैसे देण्यात येईल असे वचन हमासकडून देण्यात येईल असा दावा व्हिडिओमधील एका पुरुषाने केला आहे.इस्रायल सिक्युरिटीज अथॉरिटीकडून (ISA) जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बोलत आहे की, जो कोणी इस्रायली नागरिकाचे अपहरण करून गाझामध्ये आणेल त्याला हमासकडून दहाहजार युएसडॉलर व एक रूम बक्षीस स्वरुपात देण्यात येईल.

हे ही वाचा:

चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले

शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!

देशातील सहा टक्के नागरिक खटल्यांमध्ये गुंतलेले!

कांदिवलीमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

तो पुढे म्हणाला की, वृद्ध महिला आणि मुलांचे अपहरण करण्याच्या सूचना मला आणि माझ्या साथीदारांना देण्यात आल्या होत्या.शक्य होईल तेवढ्या घरांची तपासणी करा आणि नागरिकांचे अपहरण करून त्यांना बंदी बनवा.एका दहशतवाद्यांने सांगितले की, एका पिडीतेचा कुत्रा घराबाहेर आला आणि मी त्याला गोळ्या घातल्या.पिडीत महिलेचा मृतदेह जमिनीवर पडला होता. मी तिलाही गोळी मारली.यावर माझा कमांडर माझ्यावर ओरडत म्हणाला, मृतदेहावर गोळी मारून गोळी वाया घालवत आहेस.आणखी एका दहशतवाद्याने हल्ल्यादरम्यान दोन घरे जाळल्याची कबुली दिली आहे. “आम्ही जे करायला आलो ते पूर्ण केले आणि नंतर दोन घरे जाळून टाकली,” तो म्हणाला.इस्रायल सिक्युरिटीज अथॉरिटीकडून जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचे स्वरूप पुढे आले आहे.

आयएसएने पुढे म्हटले आहे की, व्हिडिओंमध्ये कबुली देणारे हे लोक हल्ला करण्यासाठी जमिनीवर होते, तर हमासचे लष्करी शाखेचे वरिष्ठ कमांडर यांना सूचना देत लपून बसले होते.दरम्यान, इस्रायल-हमास युद्धाचा आजचा १७ दिवस आहे.यावर पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायल-हमासच्या युद्धात गाझामधील मृतांची संख्या ५,००० वर पोहचली आहे. यामध्ये इस्लामी अतिरेकींचे प्रमाण अधिक आहे.१,४०० पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले असून एकूण मृतांची संख्या आता ६,४०० झाली आहे.

Exit mobile version