देशाच्या विरोधात मोहीम चालवणारी १०४ यूट्यूब चॅनेल तसेच पाच ट्विटर अकाऊंट तसेच सहा वेबसाइट्सवर समाजात संभ्रम आणि भीती पसरवल्याबद्दल आयटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तरात ही माहिती दिली. भारत सरकार देशाविरुद्ध मोहीम चालवणाऱ्या आणि समाजात संभ्रम आणि भीती पसरवणाऱ्या प्रकरणी आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य जुगलसिंह लोखंडवाला यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘फेक न्यूज’च्या प्रसारावर प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री ठाकूर म्हणाल, अशा प्रकरणांमध्ये आतापर्यंत १०४ यूट्यूब चॅनेल, ४५व्हिडिओ, चार फेसबुक अकाउंट आणि दोन पोस्ट, तीन इन्स्टाग्राम आणि पाच ट्विटर अकाउंट आणि सहा वेबसाइट्सवर कारवाई करण्यात आली आहे असे ते म्हणाले. यासोबतच दोन अॅप्सवरही बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ठाकूर म्हणाले की अशा प्रकरणांमध्ये भारत सरकार संबंधित प्लॅटफॉर्मला पत्र लिहिते. अशा प्रकरणांमध्ये सरकारने कारवाई केली असून गरज पडल्यास यापुढेही कारवाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
…म्हणून गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज सापडले
ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामिनदारच शिंदे गटात
मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!
या आठवड्याच्या सुरुवातीला मंत्रालयाच्या निर्देशानुसार, यूट्यूबने भारताचे सर्वोच्च न्यायालय, भारताचे सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक आयोगाविषयी खोटी माहिती अपलोड केली आहे. भारतातील ३० कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ३३ लाख सबस्क्रायबर्स असलेले ३ चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.