वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण

वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण

केरळमधील एका आजीने कौतुकास्पद कामगिरी करत परीक्षेत १०० पैकी ८९ गुण मिळवले आहेत. केरळ राज्य साक्षरता अभियान परीक्षेत या आजीने ही कामगिरी करत सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. आजींच्या या यशाची माहिती केरळ सरकारमधील शिक्षण आणि कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी ट्विटरवर दिली. आजींच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शिक्षण आणि कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी ट्विटरवर आजीचा फोटो शेअर केला आणि लिहिले “केरळ राज्य साक्षरता अभियानाच्या परीक्षेत कोट्टायम येथील १०४ वर्षीय कुट्टीअम्मा यांनी ८९/१०० गुण मिळवले आहेत. ज्ञानाच्या जगात प्रवेश करण्यासाठी वयाचा अडथळा नसतो. अत्यंत आदर आणि प्रेमाने, मी कुट्टीअम्मा आणि इतर सर्व नवीन शिकणाऱ्यांना शुभेच्छा देतो.” अशा भावना व्यक्त करत त्यांनी कुट्टीअम्मा यांचा फोटोही पोस्ट केला आहे.

हे ही वाचा:

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

‘शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही’

बाबासाहेब पुरंदरेंना मान्यवरांची आदरांजली

‘केरळ राज्य साक्षरता मिशन’ हे राज्य सरकारद्वारे चालवले जाणारे एक मिशन आहे याअंतर्गत प्रत्येक नागरिकाची साक्षरता, शिक्षण आणि आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. याच मिशन अंतर्गत शिकणाऱ्या कुट्टीअम्मा यांनी दाखवून दिले आहे की, शिक्षणाला वयाचे बंधन नसते. आजीच्या या कामगिरीवर समाजमाध्यमांवरही कौतुकाचा आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या संदेशाचा पाऊस बरसत आहे.

Exit mobile version