देशात रविवारी १०,०९३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु थोडाफार दिलासा म्हणजे कोविडच्या प्रकरणांमध्ये किंचित घट नोंदवली गेली आहे. शनिवारी नोंद झालेल्या १०,७५३ कोरोना रुग्णाच्या संख्येच्या तुलनेत शुक्रवारी ही संख्या ११,१०९ इतकी होती. रविवारी या रुग्णांच्या संख्येत थोडीफार घट झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार सक्रिय प्रकरणांची एकूण संख्या ५७,५४२ नोंद झाली आहे. जी एकूण प्रकरणाच्या तुलनेत ०. ३ टक्के आहे.देशात गेल्या २४ तासांत ६,२४८ रुग्ण बरे झाले असून, एकूण उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या ४,४२,२९४ झाली आहे, तर बरे होण्याचा दर सध्या ९८.६८ टक्के आहे.
गेल्या २४ तासांत८०७ इंजेक्शन्ससह, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण २२०. कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. रविवारी, या आजाराने २३ लोक मरण पावले आहेत. मृत्यू दराची नोंद १. १९ % झाली आहे. मृत्यू दराने मृतांची संख्या ५,३१,११४ वर गेली आहे. .त्याच वेळी, गेल्या२४ तासात सुमारे १,७९,८५३ कोरोनाव्हायरस चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ४४ मालमत्तांना मुंबई अग्निशमन दलाने बजावल्या नोटीस
काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची…
पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला, २१ कोटींचे हेरॉईन जप्त
मुंबई पुणे जुन्या मार्गावर बस दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, गोरेगावचे झांज पथकही होते
शनिवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची ६६० नवीन प्रकरणे समोर आली असून संसर्गामुळे मृत्यूची दोन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमधून ही माहिती मिळाली आहे एका दिवसापूर्वी, राज्यात संसर्गाची १,१५२नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि चार लोकांचा मृत्यू झाला. बुलेटिननुसार, शनिवारी राज्यात संसर्गाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या ८१,५५,१८९ झाली आहे तर मृतांची संख्या १,४८,४७७ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के आहे. महाराष्ट्रात५३९रुग्ण बरे झाल्यानंतर, संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या ८०,००,६६५ झाली आहे. राज्यातील संसर्गातून बरे होण्याचा दर ९८.११ टक्के आहे.